*गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

*कोंकण एक्सप्रेस*

*गृहनिर्माण धोरणाचा सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 मुंबईदि. १९ :

गृहनिर्माण धोरणाच्या  माध्यमातून सर्वांसाठी घरे या संकल्पनेला प्रत्यक्ष अंमलबजावणीत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. हे धोरण सर्वसमावेशक असणार असून, ज्येष्ठ नागरिकनोकरदार महिलाविद्यार्थी आणि औद्योगिक कामगार यांसारख्या विविध समाजघटकांचा समावेश यात करण्यात आला आहे. प्रस्तावित गृहनिर्माण धोरणाचा  सर्वंकष आराखडा मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात यावाअसे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

    सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गृहनिर्माण धोरणासंदर्भात सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेगृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयरमुख्य सचिव सुजाता सौनिकअपर मुख्य सचिव विकास खारगेगृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंहनगर विकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता उपस्थित होते.

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेराज्यातील वाढते शहरीकरण आणि घरांची वाढती मागणी लक्षात घेतासर्व समाजघटकांसाठी सुरक्षित व परवडणारी घरे या धोरणाच्या माध्यमातून उपलब्ध होतील.

या बैठकीत गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह यांनी गृहनिर्माण धोरणाची सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!