*कोंकण एक्सप्रेस*
*श्री रामसीता देवतांच्या मूर्तींची पुनःप्राण प्रतिष्ठापना*
*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला येथील श्री देव रामेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण कार्याअंतर्गत श्री देव रामेश्वराच्या कौलप्रसादाप्रमाणे २२ व २३ मे कालावधीत नविन मंदिरात श्री रामसीता देवतांच्या मूर्तींची पुनःप्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.
यानिमित्त २२ मे रोजी सकाळी प्रायश्चित विधी, देवता प्रार्थना, गणेश पूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्यवरण, स्थळप्राकार शुद्धी, कर्मांगभूत देवता आवाहन पूजन, जलाधिवास, ग्रहयजन, वास्तू यजन, आरती व तीर्थप्रसाद, २३ मे रोजी स्थळप्राकार शुद्धी, आवाहित देवता पूजन, प्रधान होम, सकाळी ११.५५ च्या मुहूर्तावर कलशारोहण, दुपारी १२.०५ च्या शुभमुहूर्तावर श्रीराम सीता यांची पुनःप्राणप्रतिष्ठापना, महापूजा, बलिदान, पूर्णाहूती, आरती व तीर्थप्रसाद, सायं.७ वा. वेंगुर्ला शाळा नं.४च्या आजीमाजी मुलींचे ‘श्री राम दर्शन‘ हा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.