*कोंकण एक्सप्रेस*
*नाटळ तळेवाडी येथील कुलस्वामिनी श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार दि. २० मे रोजी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नाटळ तळेवाडी येथील जागृत देवस्थान असलेल्या भवानी स्थानात कुलस्वामिनी श्री भवानी देवीचा त्रैवार्षिक गोंधळ उत्सव मंगळवार दि. २० मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमानी यावर्षी साजरा होत आहे.
सह्याद्री च्या कुशीत उगम पावलेल्या नदी तिरावर असलेल्या निसर्गरम्य अशा भवानीस्थानात कावळेटेम्ब वाडीतील सावंत पटेल मंडळी भवानी देवीचा दसरा आणि गोंधळ मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावाने साजरा करतात. त्यावेळी गावातील इतर बारापाचांचे मान पान काढले जातात. या भवानीस्थानात साजरे होणारे हे दोन्ही उत्सव दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून गावातील आणि गावाबाहेरील लोकांची गर्दी वाढत आहे. बऱ्याच जणांना या जागृत स्थानाची प्रचिती आल्याने अनेक लोक या उत्सवांच्या वेळी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी खूप श्रद्धेने नवस बोलतात आणि त्या पूर्ण झाल्यानंतर इथेच येऊन आपला नवस मोठ्या भक्ती भावाने फेडतात.
त्रैवार्षिक गोंधळ उत्सवा निमित्त सकाळी ९. ३० श्री रामेश्वर मंदिर नाटळ गाऱ्हाणे करण्यासाठी उपस्थित रहाणे, सकाळी १०. ३० वा. श्री भवानी देवी घराकडे शाश्वतपुजा, गाऱ्हाणे, बलिदान
दुपारी ३. ०० वा. महाप्रसाद, संध्याकाळी ७. ०० वा. पाच घरे फिरून दिक्षा घेणे, नंतर मांड भरणे, दिवटी फेर धरणे, ओटी भरणे, नंतर महाप्रसाद होणार आहे. रात्रौ ११ वा. गोंधळीजागरण कथा पुराण कार्यक्रमाला सुरवात होईल. दि. २१ रोजी सकाळी ब्राम्हण भोजन होईल. त्यानंतर बुधवार दि. २३ में २०२५ रोजी सकाळी ५. ३० वा. गोंधळाची सांगता होईल. या सर्व कार्यक्रमाचा भाविकांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त कावळेटेंबकर वाडी, पाहुणे, ग्रामस्थ, विक्रम सावंत यांनी केले आहे.