*कोंकण एक्सप्रेस*
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भगवान लोके यांचा सत्कार..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी भगवान लोके यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शाल , पुष्पगुच्छ देऊन उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर यांच्या हस्ते सत्कार करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना संपर्क अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे ,कणकवली तालुकाध्यक्ष शांताराम सादये, कणकवली शहराध्यक्ष योगेश कदम आदींसह मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.