*कोंकण एक्सप्रेस*
*”तिरंगा यात्रेने दणाणला देवगड परिसर; देशप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग”*
*देवगड ः प्रतिनिधी”
भारत माता की जय, सामर्थ्य भारताचे, भारतीय सैनिकांचा विजय असो, वंदे मातरम् अशा राष्ट्रभक्तिपर घोषणांनी संपूर्ण देवगड परिसर रविवारी दणाणून गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे मनोबल वाढवण्यासाठी भाजप देवगड मंडळ व देशप्रेमी नागरिकांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
ही तिरंगा यात्रा रविवारी सकाळी १०.३० वाजता देवगड येथील सातपायरी उद्यानाजवळील गणेश मंदिर येथून सुरु झाली. भारत माता की जयघोषात सुरू झालेली यात्रा देवगड एस.टी. स्टँडपर्यंत घोषणाबाजी करत पुढे सरकली आणि राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने तिची सांगता झाली.
या तिरंगा यात्रेत माजी आमदार अजित गोगटे, भाजपचे सरचिटणीस संदीप साटम, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ बाळ खडपे, नंदकुमार घाटे, प्रकाश राणे, जिल्हा बँक संचालक प्रकाश बोडस,, महिला अध्यक्षा उषकला केळुसकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, प्रियांका
साळसकर, नगरसेविका तन्वी चांदोस्कर, ऋचाली पाटकर, रेश्मा जोशी, तन्वी शिंदे, जिल्हा चिटणीस संतोष किंजवडेकर, युवामोर्चा अध्यक्ष अमित साटम, ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष निशिकांत साटम, दत्तात्रय बलवान, शरद ठुकरुल, विश्वामित्र खडपकर, शिवाजी कांदळगावकर, राजू शेट्ये, शहराध्यक्ष दयानंद पाटील, राजेंद्र वालकर, संतोष फाटक, उल्हास मणचेकर, चेतन कोयंडे, शिवराम निकम, शामराव पाटील, सुनील पारकर, ज्ञानेश्वर खवळे, संजय बांदेकर, धर्मराज जोशी व अन्य भाजप पदाधिकारी तसेच असंख्य देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या यात्रेमुळे संपूर्ण देवगड शहर राष्ट्रभक्तीच्या वातावरणात न्हालं होतं.