सावंतवाडी व्यापारी संकुलाच्या अकत्यारीत फळ व्यवसाय भाजी व्यवसाय करणाऱ्या या परप्रांतीयांचा वाली कोण ? अमित वेंगुर्लेकर*

सावंतवाडी व्यापारी संकुलाच्या अकत्यारीत फळ व्यवसाय भाजी व्यवसाय करणाऱ्या या परप्रांतीयांचा वाली कोण ? अमित वेंगुर्लेकर*

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी व्यापारी संकुलाच्या अकत्यारीत फळ व्यवसाय भाजी व्यवसाय करणाऱ्या या परप्रांतीयांचा वाली कोण ? अमित वेंगुर्लेकर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

एकीकडे सावंतवाडी तालुक्यातील गावागावातून येणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना उदरनिर्वाहासाठी स्थानिक बाजारपेठेत आपला व्यवसाय करताना संबंधित नगरपालिकेतील कर्मचारी नियमावली दाखवून अक्षरशः हाकलपट्टी करतात मग ते मच्छी विक्रेते असो किंवा भाजी व्यवसाय,ही जागा तुझी नाही !
अशा वेळेस फिनैल फेकणे,टोपली असेल तर ती लाथ मारून अरेरावी करणे, विक्रीचे समान जप्त करत उद्धट भाषेत धमकावणे हे आणि असे अनेक प्रकारचे त्रास गोर गरीब हातावरच्या पोटासाठी रोजंदारी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना सावंतवाडी नगरपालिका कर्मचारी जाणून बुजून देत आहेत !
मग याच शहरात भाडेकरू,परप्रांतीय तसेच एका नावावर अनेक दुकानं असलेल्या व्यवसायांचा हुकूमीचा एक्का कोण?
याबाबतचं उत्तर सावंतवाडी नगरपालिका मुख्याधिकारी देऊ शकतात का?
मुळात स्थानिक जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांनी पाठिंबा देणं हे त्या भागातील नगरसेवकांच कर्तव्य आहे पण भाडेकरू,परप्रांतीय किंवा एका पेक्षा अनेक दुकानं उपलब्ध करून देणं हे कितपत योग्य ठरणार आहे याचा विचार दैनंदिन व्यवसाय दस्त जमा करताना संबंधित नगरपालिकेतील कर्मचारी यांच्या निदर्शनास येत नाही का?
की जाणूनबुजून मूग गिळून गप्प बसावं लागत !!!!
मग या प्रकरणातील हस्तेखोर दलाल कोण आहे याबाबतची माहिती स्थानिक जनतेला देण्यात यावी अन्यथा माहितीचा अधिकार २००५ अन्वये अशा नगरपालिका हद्दीतील अनधिकृत व्यावसायिकांच्या पुराव्यासहित सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी ओरोस कार्यालय,पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा, राज्यमानवाधिकर आयोग महाराष्ट्र राज्य, जिल्हा पोलीस अधीक्षक मुख्यालय ओरोस कार्यालय, सावंतवाडी व्यापारी संघटना तालुका कमिटी यांच्याकडे तक्रार कर्ज दाखल करून चुकीच्या पद्धतीने तसेच हप्तेखोर दलालांच्या वरधास्थामुळे सावंतवाडी बाजाररपेठे तसेच आजुबाजूच्या परिसरात परप्रांतियांना अनधिकृत व्यवसाय करण्यास कायमची बंदी करण्यात यावी अशी लेखी मागणी संबंधित प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे मानवाधिकार न्याय सुरक्षा संगठन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर यांनी पत्रकार माध्यमातून बोलताना सांगितले आहे.
सावंतवाडी व्यापारी संकुलासाठी नवनिर्वाचित व्यापारी संकुलाच्या उभारणीचे
काम सुरू आहे आणि हे फक्त स्थानिक व्यावसायिकांना उदरनिर्वाह करण्यासाठी आवश्यक असून परप्रांतीयांना घुसखोरी करण्यापासून रोखणं फार गरजेचं असल्याचे श्री अमित वेंगुर्लेकर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!