*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी तेलीवाडीत २१ मे रोजी जागरण गोंधळ उत्सव*
*शिरगांव | संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या साळशी येथील तेलीवाडी येथे बुधवार दिनांक २१ मे रोजी भवानी मातेचा ‘जागरण गोंधळ’ हा धार्मिक उत्सव आयोजित करण्यात आला असून रविवार दि. १८ मे रोजी ‘होम हवन’ हा कार्यक्रम होणार आहे.
बुधवार दि. २१ मे रोजी सकाळी ८ वाजता देवीची महापूजा आणि संबळ वादन, सायंकाळी ६ वाजता जोगवा, सायंकाळी ७.३० ते रात्री ९.३० पर्यंत महाप्रसाद, रात्री १० वाजता मांड भरणे व कथाकथन कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व तेली ज्ञात बांधवांनी या उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सर्व तेली (साळसकर ) परिवार यांनी केले आहे.