*कोकण Express*
*कट्टा येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान; आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम*
*कट्टा येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान; आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम
*चौके ः प्रतिनिधी*
कुडाळ मालवणचे लाडके आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माजी कट्टा ग्रा.प. सदस्य प्रशांत टेंबुलकर यांच्या सहकार्याने शिवसेना पेंडूर विभागाच्या वतीने ग्रामीण रुग्णालय कट्टा येथील सर्व कर्मचाऱ्यांचा कोरोना योद्ध्यां म्हणून सन्मान करण्यात आला तसेच त्यांच्या या कार्याला सलाम करत आभार व्यक्त करण्यात आले
यावेळी श्री आंगणे, श्रीम. तळवडेकर, श्रीम. घाटवळ, श्री. राऊळ, श्रीम. सावंत, मंदार हिर्लेकर यांच्यासह रुग्णालयातील सर्व कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला सर्व सन्मानित कारोना योद्ध्यानी देखील आभार मानत आपला जो सन्मान केला त्याबद्दल आभार व्यक्त करत आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी माजी समाजकल्याण सभापती बाळ महाभोज, माजी ग्रा. प. सदस्य प्रशांत टेंबुलकर, प. स. सदस्य कमलाकर गावडे, महिला तालुकाप्रमुख श्वेता सावंत, लता खोत, विभागप्रमुख अण्णा गुराम, दर्शन म्हाडगुत, देवदास रेवडेकर, विष्णु लाड, दादा वायंगणकर, प्रदीप सावंत, संतोष नागवेकर, संदीप ढोलम आदी पदाधिकारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते.