*कोंकण एक्सप्रेस*
*पहिल्याच पावसात महावितरण चा खेळखंडोबा अधिकारी काढताहेत झोपा निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे*
*बांदा ः प्रतिनिधी*
मडुरा पंचक्रोशीत कालपासून विद्युत यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत एक दिवस पाऊस पडला की यांचं सुरू झालं आज पंचक्रोशीतील अनेक विद्युत उपकरणे घरातील यांच्या या मनमानी कारभारामुळे जळून खाक झालेली आहे उदाहरणार्थ फ्रीज असून दे, फॅन, इन्वर्टर असून दे या अधिकाऱ्यांना लेण देणं कांहीं नाही शाखा कार्यालय बांदा २ कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर हे मोबाईल बंद करून आहेत सकाळपासून त्यांना अनेक लोकप्रतिनिधी फोन लावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु ते फोन का उचलायला तयार नाहीत जानेवारी महिन्यामध्ये यांना लेखी पत्र दिलेली आहेत की गावातील विद्युत वाहिन्यांवरील झाडे तोडा तसेच जीर्णपोल तात्काळ बदला पावसाळ्यामध्ये पहिला पाऊस पडला की इन्सुलटर गरम होऊन ते फुटतात मग यांना पावसाच्या अगोदर पॉलीमेकर लावता येत नाही का सगळा खेळखंडोबा चालू आहे इथले स्थानिक आमदार हे नको त्या ठिकाणी सिंधूरत्न योजनेतून परस्पर वैयक्तिक ट्रांसफार्मरचा लाभ देत आहेत. गावागावात ट्रांसफार्मर ची मागणी असताना लोकांना ते मिळत नाहीत. स्थानिक आमदारांचं कर्तव्य आहे की पावसाळ्यापूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणे गरजेचे आहे परंतु ती का घेतली नाही पावसाळा सुरू झाला की बैठक घेणार. काल विद्युत ग्राहक संघटना तसेच उपकार्यकारी अभियंता श्री. राक्षे यांच्या समवेत बैठक झाली होती या बैठकीला अधिकारी हजर नव्हते. गावात विद्युत भार अधिक असल्यामुळे आज गावागावात उपकरणे उच्च दाबामुळे जळून खाक होत आहे याला जबाबदार कोण त्यामुळे जी उपकरणे गावागावात जळालेली झालेली आहेत त्यांचे इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर घेऊन पंचनामे करा जर यंत्रणा सुधारली नाही आणि विजेचा खेळ खंडोबा असाच पुढे सुरू राहिला तर सर्व पंचक्रोशीतले लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ आपल्या कार्यालयाला येऊन बघा काय करणार ते असा सज्जड इशाराही निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी दिला आहे.