*कोकण Express*
*कणकवली सिद्धार्थनगरमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून ६५ लाखांची विकासकामे मंजूर*
*विरोधी गटनेते सुशांत नाईक, नगरसेवक कन्हैया पारकर यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत कणकवली शहरात सिद्धार्थनगर येथे तब्बल ६५ लाखांची विकास कामे मंजूर करण्यात आल्याची माहिती शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक आणि कन्हैया पारकर यांनी दिली. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्याकडे या विकास कामांबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. त्यांच्या माध्यमातून या कामांना मंजुरी मिळाल्याचे नाईक आणि पारकर यांनी सांगितले. कणकवली शहरातील सिद्धार्थनगरमध्ये डॉ. आंबेडकर भवनजवळ सभामंडप, स्टेज बांधणे (४० लाख), सिद्धार्थनगर येथे अंगणवाडीचे बांधकाम करणे (१५ लाख) व सिद्धार्थनगर येथील स्मशानभूमीचे सुशोभिकरण करणे (१० लाख) अशा तीन कामांसाठी एकूण ६५ लाख रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आल्याची माहिती नाईक व पारकर यांनी दिली. येत्या काळातही कणकवली शहराचा विकास साधण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कणकवली शहरासाठी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून देणार देण्यात येणार असल्याची सांगण्यात आले.