कासार्डे तर्फेवाडीत पिपळेश्वर मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

कासार्डे तर्फेवाडीत पिपळेश्वर मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*कासार्डे तर्फेवाडीत पिपळेश्वर मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन*

*कासार्डे प्रतिनिधी; संजय भोसले*

कासार्डे तर्फेवाडीतील पिंपळेश्‍वर मंदिरात 14 ते16 मे रोजी वार्षिक महोत्सव सोहळा होणार आहे. त्या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मंडळाने गेली अनेक वर्ष जनजागृतीपर सामाजिक कार्यक्रम राबविले .15 मे रोजी संध्‍याकाळी 6 ते 7 र वाजता स्‍थानिक तर्फेवाडीे वारकरी भजन तर 7 ते 9 आचरा – पारवाडी ब्राम्‍हणदेव सांस्‍कृतिक दिंडी भजन बुवा विलास मेस्‍त्री यांचे होणार आहे . तर 15 मे रोजी दुपारी 3 वाजता सत्यनारायणाची महापूजा , संध्‍याकाळी हळदीकुंकू व 8 ते 9 दरम्यान महाप्रसाद होईल. रात्री 9 पासून भजनांचा 20 X 20 संगीत तिरंगी भजनांचा सामना होणार आहे. माणगांव कुडाळ वेतोबा प्रासादिक भजन मंडळाचे बुवा दिपक नानचे व मोंड नाडण सिध्‍दीविनायक प्रासादिक भजन मंडळाचे बुवा राजेंद्र मोंडे व कासार्डेतील श्री दत्‍तगुरू प्रासादिक भजन मंडळाचे बुवा प्रकाश पारकर यांच्‍या तिरंगी सामना रंगणार आहे . तर 16 मे रोजी दहीकाला उत्सव होणार आहे.अंतर्गत पिंपळेश्‍वर कासार्डे तर्फेवाडी विकास मंडळाकडून सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्‍याचे मुंबइ मंडळाचे अध्‍यक्ष दिनेश तर्फे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!