*कोंकण एक्सप्रेस*
*घोणसरी खवळेभाटले वाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई व श्री कालिकामाता मंदिराचा १५ वा वर्धापन दिन सोहळा आज होणार संपन्न*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील घोणसरी खवळेभाटले वाडीतील श्री विठ्ठल रखुमाई व श्री कालिकामाता मंदिराचा १५ वा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
दि.१४ मे रोजी कालिकामाता युवा स्पोर्ट आयोजित भव्य नाईट अंडरआर्म नाईट सर्कल क्रिकेट स्पर्धा.दि १५ मे रोजी रात्री ०९ वाजता स्थानिक कलाकारांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम.
दि.१६ मे रोजी सकाळी ८:३० ते ०९:३० श्री कालिकामाता मंदिर अभिषेक, ०९:४५ ते १०:३० श्री विठ्ठल रखुमाई मंदिर अभिषेक, सकाळी ११ ते ०१ सत्यनारायण महापूजा, दुपारी ०१ ते ०१:३० आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ०१:३० ते ०३ पर्यंत महाप्रसाद,०३:३० ते ०४:३० महिलांचे हळदी कुंकू समारंभ, सायं. ०७:३० ते ०८:३० स्थानिक मंडळाचे भजन,रात्री ०९ ते १०:२० मान्यवरांचा सत्कार समारंभ,क्रिकेट स्पर्धांचे बक्षीस वितरण,लकी ड्रॉ स्पर्धेचा बक्षीस वितरण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि रात्रौ ठीक १०:३० वाजता वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली कुडाळ यांचा ट्रिकसीन युक्त दणदणीत महान पौराणिक दशावतारी नाट्य प्रयोग होणार आहे.
या सोहळ्यासाठी महाप्रसाद दाते म्हणून श्री प्रदीप रामदास एकावडे व मुंबई येथील द न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेड मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तरी या संपूर्ण सोहळ्यास उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ मुंबई व श्री विठ्ठल रखुमाई सेवा कमिटी घोणसरी खवळेभाटले वाडीच्या वतीने करण्यात आले आहे.