विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेच्या दहावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेतील फेब्रुवारी मार्च २०२५ शालान्त परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षण प्रसारक मंडळ कणवलीचे सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब व विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आला या वर्षी प्रशालेचा निकाल 98 . 97 % लागला असून विद्यामंदिरच्या यशस्वी वाटचालीत मानाचा तूरा खोवला गेला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात द्वितीय क्रमांक व कणकवली तालुक्यात पहिला क्रमांक कुमारी विधी चिंदरकर व ध्रुव तेंडोलकर या विद्यार्थांनी मिळविला त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव श्री विजयकुमार वळंजू साहेब यांनी केला त्यांच्या यशस्वी वाटचालीला शुभेच्छा दिल्या . तसेच कुमार अथर्व कोचरेकर कु देवश्री वालावलकर कु . श्वेद चिंदरकर कु . आदित्य वनवे या विद्यार्थ्यांचा सत्कार विश्वस्त श्री अनिलपंत डेगवेकर साहेब यांनी केला विद्यामंदिर इंग्लिश स्कूलचा निकाल १००% लागला असून प्रशालेत कुमार तन्मय संतोष राणे प्रशालेत प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला कुमारी आर्या आचरेकर कु उत्कर्ष डावरे कु दिव्या नार्वेकर कु आदित्य जाधव . या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव श्री वळंजू साहेब व श्री डेगवेकर साहेब यांनी केला . यावेळी प्रथमच इंग्लिश स्कूलने १००% निकालाचे योगदान दिल्या बद्दल विद्यार्थी व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी संख्येचे सचिव श्री वळंजू साहेब यांनी शुभेच्छा व्यक्त्य केल्या . या प्रसंगी मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या . सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक श्री जनार्दन शेळके सरांनी केले विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे दहावीचे यशस्वी विद्यार्थी व पालक तसेच इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ दिव्या राणे प्राथमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ करंबेळकर मॅडम उपस्थित होत्या . कणकवली कॉलेजचे प्राचार्य प्रा . महालिंगे सर पर्यवेक्षक प्रा माने सर माजी विद्यार्थी बिले साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार कलाशिक्षक श्री प्रसाद राणे सरांनी मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!