*कोंकण एक्सप्रेस*
*दहावी बोर्ड परीक्षेत कासार्डे माध्यमिक विद्यालयाची कु.वैदेही राणे ९७%गुणासह विद्यालयात अव्वल..*
*प्रशालेचा 99.14 टक्के निकाल*
*कासार्डे ः संजय भोसले*
कासार्डे विकास मंडळ मुंबई संचलित, कासार्डे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश करून यशाची परंपरा कायम राखली आहे.प्रशालेतून कु.वैदेही मधुसूदन राणे हिने 97 टक्के गुणांसह विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
११७ पैकी ११६ उत्तीर्ण झाले असून प्रशालेचा९९.१४ टक्के निकाल लागला आहे.
यामध्ये विद्यालयातील कु.वैदेही मधूसुदन राणे हिने ४८५ गुणासह ९७%मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला आहे तर कु.वेदिका दिपक तेली (४८४ गुण) ९६.८०% मिळवत द्वितीय तर कु.श्रावणी रवींद्र जाधव हिने(४८३गुण) ९६.६० टक्के मिळवून विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. कु.श्रावणी जाधव हिने समाजशास्त्र विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून बोर्डात प्रथम येण्याचा विक्रम केला.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे कासार्डे विकास मंडळ मुंबईचे अध्यक्ष मनोज शेलार,सरचिटणीस रोहिदास नकाशे, स्थानिक व्यवस्था समितीचे कार्याध्यक्ष संजय पाताडे,स्कूल कमिटीचे सर्व पदाधिकारी, पालक शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी,विद्यालयाच्या प्राचार्या सौ.बी.बी.बिसूरे,पर्यवेक्षक एस.व्ही.राणे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत. या यशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.