आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन साजरा

आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन साजरा*

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

इंडियन रेडक्रॉस सोसायटी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने कुडाळ हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस दिन साजरा करण्यात आला. यावेळी रेडक्रॉसची मानवता, स्वातंत्र्य, निष्पक्षपातीपणा, एकात्मता सर्वव्यपकता आदी मूलभूत तत्वांचा जागर करण्यात आला.

प्रारंभी संस्थापक हेनरी ड्युनांट यांच्या प्रतिमेला उपाध्यक्ष प्राचार्य सुभाष गोवेकर, सचिव डॉ.राजेंद्र गावस्कर, अॅड.नंदन वेंगुर्लेकर, लेखापाल केशव फाटक यांच्यावतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.

सचिव डॉ.गावस्कर यांनी इंडियन रेडक्रॉसचे राष्ट्रीय प्रधान सचिव डॉ.जैन यांनी यानिमित्त कार्यकर्ते व पदाधिकारी याना दिलेल्या संदेशाचे वाचन करून आपत्कालीन सहाय्यता, नागरी सुरक्षा, प्रथमोपचार यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाला घेणे अनिवार्य असून रेडक्रॉस त्यासंदर्भात विनामूल्य व योग्य प्रशिक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या समारोहानंतर कार्यकारिणी सदस्यांची बैठक होऊन गत कार्याचा आढावा व आगामी कार्यधोरणा बाबत नियोजन करण्यात आले. अॅड. नंदन वेंगुर्लेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!