गिर्ये येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक व शोभायात्रा

गिर्ये येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक व शोभायात्रा

*कोंकण एक्सप्रेस*

*गिर्ये येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक व शोभायात्रा*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

देवगड तालुक्यातील मोजे गिर्ये येथील बौद्ध विहाराच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ११ मे रोजी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. याप्रसंगी विशेष आकर्षण म्हणून खास मुंबईतून बुद्ध प्रदर्शनी गिर्ये गावातील नागरिकांसाठी लावण्यात आली. ज्याचे उद्घाटन पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते करण्यात आली. अशा नाविण्यपूर्ण प्रदर्शनीचे प्रथमच जिल्ह्यात प्रदर्शन मांडण्यात आले होते.

1974 साली मौजे गिर्ये बौध्दजन विकास मंडळाची स्थापना विजय उर्फ भाई गिरकर यांनी वयाच्या 22 व्या वर्षी अध्यक्ष असताना स्थापना केली. सन 1975 साली गिर्ये बौध्दवाडी मध्ये बुद्ध‌विहाराचे बांधकाम त्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. 1991 पासून दररोज बुद्ध विहारामध्ये बुद्ध त्रिमाटाचे पठन सायं 7.30 वाजता करून बुद्ध वंदना घेतली जाते, ती परंपरा आता पर्यंत अविरत चालू आहे. 2025 ला या बुद्धविहाराला ५० वर्षे पूर्ण झाले त्या निमित्त या मंडळाच्या वतीने नवीन स्वरूपात बौद्ध विहाराची पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. या शोभायात्रेत मोठ्या प्रमाणात महिलांनी सहभागी होऊन लेझीम नृत्य सादर केले. याप्रसंगी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!