मनाची समाधी महत्वाची आहे हा विचार बुद्धानी जगाला दिला

मनाची समाधी महत्वाची आहे हा विचार बुद्धानी जगाला दिला

*कोंकण एक्सप्रेस*

*मनाची समाधी महत्वाची आहे हा विचार बुद्धानी जगाला दिला*

*राज्याचे सांस्कृतिक विभाग व कार्य मंत्री आशिष शेलार यांचे प्रतिपादन*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणजे दया, क्षमा, शांती हा विचार आपल्या प्रत्येकाच्या वर्तनातून होताना दिसतो एवढी विचारांची ताकद बुद्धांच्या शिकवणीत दिसते. ज्या काळामध्ये भगवान बुद्ध राजश्र्यात राजपुत्र असताना आनंदी जीवन जगण्याची वैभव असताना ते माणसाला जीवनात समाधान व जीवनात शांती निर्माण होण्यासाठी त्या शोधात ते निघाले. त्यांनी संपूर्ण जगाला असा मार्ग दिला तो बौद्ध धम्माची स्थापना करीत शांतीचा संदेश दिला. सुखाच्या सर्वच गोष्टीत आपल्याला समाधान मिळते असे नाही तर मनाची समाधी महत्वाची आहे हा विचार बुद्धानी जगाला दिला आहे. मनाला समाधी प्राप्त करायची असेल तर आपण आत्मबोध केला पाहिजे. जगाला दिशा देणारा धम्म तथागत भगवान बुध्दानी दिला आहे असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक विभाग व कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.

मौजे गिर्ये बौद्धजन विकास मंडळ मुंबई/ ग्रामीण, पंचशील महिला मंडळ आयोजित बुद्ध विहाराचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम सोमवारी गिर्ये येथील बुद्ध विहारात संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री शेलार उपस्थित होते. यावेळी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते बुद्ध विहाराचे उदघाट्न करण्यात आले. विचारमंचावर समारंभ अध्यक्ष माजी मंत्री विजय (भाई) गिरकर, स्वागतध्यक्ष सरपंच सौ. लता दिलीप गिरकर, पदमश्री दादा इडाते, माजी आमदार ऍड. अजित गोगटे, कमलाकर दळवी, अतुल काळसेकर, भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष राजा भुजबळ, बंडया नारकर, आरिफ बगदादी, भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, रवींद्र तिर्लॉटकर, डॉ. अमोल तेली, गिर्ये बौद्धजन विकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष भरत गिरकर, सरचिटणीस संजय शंकर गिरकर, ग्रामीण शाखा अध्यक्ष संतोष भिकाजी गिरकर, सरचिटणीस सचिन गिरकर, भंते शांतीदीप व भंते कस्यप आदी उपस्थित होते. सुवर्ण महोत्सवी बुद्ध विहाराचे उदघाट्न तसेच बुद्ध मूर्तीची स्थापना भन्ते शांतीदीप व कस्यप यांनी बुद्ध पुजापाठ विधिवत केला. पालकमंत्री राणे व आशिष शेलार यांच्या हस्ते पंचशील ध्वजरोहन करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रदर्शनीय चित्राचे अनावरण करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक व कार्य मंत्री श्री शेलार यांनी बोलताना जगाला शांतीचा मार्ग तथागत भगवान गौतम बुध्दानी दिला. पाली या भाषेतून वंदना केली जाते त्या पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे काम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जागर संविधानाचा या सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा प्रचार करण्याचे काम शासन करीत आहे. गिर्ये येथे बुद्ध विहाराचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम माजी मंत्री जेष्ठ नेते भाई गिरकर यांनी घडवून आणला ही आभिमानास्पद बाब आहे. भाई गिरकर यांनी 50 वर्षांपूर्वी सर्वांच्या प्रयत्नातून विहार उभारले होते आज पुन्हा नव्याने त्याची उभारणी केली आहे. पालकमंत्री राणे धडाडीचे मंत्री असून त्यांनी येथील मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा मिळवून दिला आहे. आता मत्स्य बिजालाही पीकविमा प्राप्त होणार आहे असे सांगितले. पालकमंत्री नितेश राणे यांनी मार्गदर्शन करताना आज भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी होते आहे ही आनंदाचा दिवस आहे. जिल्ह्यात दोन महत्वाचे कार्यक्रम झालेत. त्यामध्ये मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला तर आज गिर्ये येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीचे दर्शन घेण्याचे भाग्य मिळाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगळेपण पाहायला मिळत असते. माजी मंत्री भाई गिरकर यांच्या पुढाकारातून भव्य बुद्ध विहार बांधण्यात आले आहे. त्याचे उदघाट्न आपल्या हस्ते होण्यासाठी माजी मंत्री गिरकर यांनी निमंत्रित केले. जेष्ठ नेत्याचा शब्द मानून आज आपण येथे आलो आहोत असे सांगितले. माझ्या प्रत्येक निवडणुकीत भाईंचे आशीर्वादाने सुरुवात होते. यांचा शब्द आम्ही सर्व कार्यकर्ते आदेश म्हणून पाळतो. विजयदुर्ग येथे सुसज्ज बंदर होण्यासाठी आपले प्रयत्न सुरु आहेत. गणपतीला मुंबई ते विजयदुर्ग अशी रोरो बोट सेवा सुरु होत आहे. 25 मे रोजी बोटीचे उदघाट्न राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. येत्या पाच वर्ष्यात या जिल्ह्याचा विकासात्मक कामातून कायापालट केला जाईल हा आपला शब्द आहे. येथील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असे उद्योग या भागात आणण्याचा आपला प्रयत्न सुरु आहेत. कोणालाही वंचित ठेवले जाणार नाही. मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्याचे काम केले आहे. याचा फायदा मच्छिमाराना होणार आहे. भगवान गौतम बुध्दानी मानवतेचा संदेश दिला आहे.त्याच मार्गाने आपण जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रत्येकाचा विकास करणे व कल्याण करण्याचा विचार दिला आहे. तुमचा विकास करणे हे कर्तव्य समजून काम करीत आहे. भगवान बुद्धांच्या विचाराची प्रेरणा घेऊन सर्वांनी चालूयात असे आवाहन केले. माजी मंत्री भाई गिरकर यांनी बोलताना 50 वर्ष्यापुर्वी आपण अध्यक्ष असताना या विहाराची सर्व गिरकर बंधूनी उभारणी केली. आज नवीन उभारणी करताना सर्व गिरकर बंधूनी स्वतःचा पैसा खर्च करून हे भव्य विहारा बांधले याचा आभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे या विहारात महमानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थी कलश ठेवण्यात आले आहे. थायलंड येथून बुद्ध मूर्ती आणली असून त्याची स्थापना करण्यात आली आहे असे सांगितले. गावाच्या विकासात्मक बोलताना गिर्ये येथील बंद असलेल्या पवनचक्की प्रकल्पच्या जागी सोलर प्रकल्प उभारण्यात यावा. तसेच येथील तरुणाचा हाताला रोजगार मिळावा यासाठी गिर्ये नाणार प्रकल्प झाला पाहिजे अशी मागणी केली. यावेळी माजी आमदार गोगटे यांनी मनोगत व्यक्त केले. अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बौद्ध भन्ते शांतीदीप यांनी उपस्थित समाज बांधवाना धम्म उपदेश केला. उपस्थितांचे आभार सरचिटणीस सचिन गिरकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!