विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल

विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल

*कोंकण एक्सप्रेस*

*विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल*

*कणकवली ः प्रतिनिधी*

शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचा दहावीचा निकाल १००% लागला संस्थेचा इतिहासात मानाचा तुरा खोवला गेला २०२५ सालची दहावी परिक्षेची पहिलीच बॅच या बॅचच्या सर्व विद्यार्थांनी इतिहास घडवून यशाची कमान तेजस्वी केली एकूण ९ विद्यार्थी परिक्षेला प्रविष्ठ झाले होते सर्वच्या सर्व विद्यार्थी यशाचे मानकरी ठरले यामध्ये प्रशालेत प्रथम क्रमांक कुमार तन्मय संतोष राणे 9o .20 % गुण मिळवून यशस्वी झाला . कु आर्या आनंद आचरेकर हिने 86 .60 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला . तृतीय क्रमांक उत्कर्ष उमेश डावरे 86 .40 % गुण मिळविले . या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मुख्याध्यापिका सौ दिव्या राणे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले तसेच विद्यामंदिर माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षक . शिक्षकेतर कर्मचारी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी यशस्वी विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!