*कोंकण एक्सप्रेस*
*माध्यमिक शालांत परीक्षेत सरस्वती हायस्कूल नांदगावचा निकाल १०० टक्के*
*नांदगाव ः प्रतिनिधी*
माध्यमिक शालांत परीक्षेत सरस्वती हायस्कूल नांदगावचा निकाल १०० टक्के लागला असून विद्यालयातून कु.मंदार शामसुंदर हडकर याने ९१.८० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक प्राप्त केला.
त्याबरोबर व्दितीय क्रमांक कु.अवनी अनिल बोभाटे ९०.८० व तृतीय क्रमांक
कु. सेजल मंगेश मोरये ८९.२० टक्के गुण मिळविले.विद्यालयातून एकूण ५७ विद्यार्थी प्रविष्ट होत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होत १०० टक्के निकाल लागला आहे. उत्तीर्ण सर्व विद्यार्थाचे संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी, सभासद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन केले.