*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर हरकूळखुर्द हायस्कूलचा 100 % निकाल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
एस.एस. सी. परीक्षेचा विद्यामंदिर हरकूळखुर्द हायस्कूलचा सन 2024-25 चा शंभर टक्के निकाल लागला. या प्रशालेतून प्रथम तसेच फोंडाघाट केंद्रात प्रथम कु. स्वराली विलास भोसले 95.60% द्वितीय क्रमांक कु. संध्या दिगंबर तेली 88.40% तृतीय क्रमांक कु. कार्तिकी पंढरी डोंगरे 85.40% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
या परीक्षेला 18 विद्यार्थी बसले होते. प्रशालेचा निकाल शंभर टक्के लागून सर्व विद्यार्थी पास झाले.त्यामध्ये विशेष प्राविण्य 11 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 05 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 02 विद्यार्थी, उत्तीर्ण झाले. हरकूळखुर्द शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष श्री. विठ्ठल शिवाजी रासम जनरल सचिव ॲड श्री. प्रभाकर काशीराम वालावलकर व पदाधिकारी तसेच शालेय समिती अध्यक्ष श्री.आशुतोष अंकुश रासम सभासद श्री.अशोक दाजी रासम श्री. सुभाष शिवाजी रासम श्री.संतोष बापूराव कदम श्री. समीर गणपत सावंत व श्री.अनिल रघुनाथ सावंत तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. किशोर अनंत यादव व ग्रामस्थ पालक यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.