*कोंकण एक्सप्रेस*
*कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने तालुका कृषी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना शाखा वैभववाडी च्या वतीने बुधवारी सकाळपासून तालुका कृषी कार्यालयाच्या समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विविध अकरा मागण्या मान्य न केल्यास 15 मे पासून बेमुदत संप करण्यात येईल असा इशारा कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने देण्यात आला.
मागण्या पुढील प्रमाणे कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, कृषी सहाय्यकाचे बदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे, कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस देण्यात यावा, नैसर्गिक आपत्ती पंचनामे करणे व तद्नंतर करावयाच्या कामाबाबत महसूल ग्रामविकास व कृषी विभागाच्या जबाबदाऱ्याबाबत योग्य न्यायसंगत कार्यपद्धती तयार करण्यात यावी, सिल्लोड तालुक्यातील कृषी सहाय्यक यांनी केलेल्या आत्महत्या च्या प्रकारानंतर सदर प्रकरणाची विभागामार्फत चौकशी पूर्ण होऊन सुद्धा संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आलेली नाही त्याबाबत तात्काळ कारवाई करण्यात यावी कृषी सहाय्यक सवर्गाच्या अस्थापना विषयक अडचणांची सोडवणूक करण्यात यावी आधी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी संघटना शाखा वैभवच्या वतीने आज एक दिवशी आंदोलन करण्यात आली या आंदोलनात कृषी सहाय्यक दीपक मसेकर बालाजी वाघमोडे समीर कदम स्नेहा गोडाम उदीर सावंत आदी कृषी सहाय्यक उपस्थित होते.