*कोंकण एक्सप्रेस*
*खांबाळे येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा होणार*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.जागर समतेचा महापुरुषांच्या विचारांचा हा भव्य जयंती महोत्सव दिनांक १२ मे २०२५, रोजी सकाळी ९.३० वाजल्या पासून खांबाळे बौद्धवाडी येथे संपन्न होणार आहे.
या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन खांबाळे बौद्ध विकास मंडळ, मुंबई/ग्रामीण,महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले असून शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमात स. ९.३० ते १०.०० वा. धम्म ध्वजारोहन व बुध्द पुजा पाठ,स.१०.०० ते १०.१५ वा. मान्यवर स्वागत व प्रस्तावना,स.१०.१५ ते १०.३० वा. कु. संस्कृती संतोष कांबळे (विद्यार्थीनी मनोगत),स.१०.३० ते ११.०० वा. गुणवंत विद्यार्थी गुणगौरव,स. ११.०० ते १२.०० वा. प्रबोधनात्मक व्याख्यान मा. जयवंत मोरे सर,सत्र दुसरे- दु. १२.०५ ते १२.१० आभार,दु. ३.०० ते ०४.०० वा. महिला व मुलांसाठी फनी गेम्स, रात्रौ ०९.०० ते ११.०० सांस्कृतिक कार्यक्रम अशी रुपरेषा आहे.