*मत्स्योद्योग मंत्री यांच्याबरोबर समन्वय साधून स्थानिक मच्छीमार यांना न्याय मिळवून द्यावा*

*मत्स्योद्योग मंत्री यांच्याबरोबर समन्वय साधून स्थानिक मच्छीमार यांना न्याय मिळवून द्यावा*

*कोंकण एक्सप्रेस*

*मत्स्योद्योग मंत्री यांच्याबरोबर समन्वय साधून स्थानिक मच्छीमार यांना न्याय मिळवून द्यावा*

*अशी मागणी भाजपा सिंधुदुर्ग मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे*

*मालवण दि प्रतिनिधी*

केंद्र व राज्य शासनाने राज्य व केंद्र सरकारच्या सागरी हद्दीमध्ये एलईडी दिवे वापरून केलेल्या मासेमारीला संपूर्णपणे बंदी घालून आणि पर्ससीन मासेमारीसाठी निकष घालूनही केंद्र शासनाच्या हद्दीत म्हणजे बारा सागरी मैल व त्यापुढील हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी एलईडी मासेमारी चालू आहे .त्यामुळे सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत असून स्थानिक मच्छीमाराला मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी झुंजावे लागत असल्याने एलईडी बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय
मत्स्योद्योग मंत्री यांच्याबरोबर समन्वय साधून स्थानिक मच्छीमार यांना न्याय मिळवून द्यावा अशी आग्रही मागणी भाजपा सिंधुदुर्ग मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे

सद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग च्या समुद्रात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर एलईडी मासेमारी चालू असल्याने मच्छिमार बांधव मेटाकुटीला आला आहे केंद्र व राज्य शासनाने राज्य व केंद्र सरकारच्या सागरी हद्दीमध्ये एलईडी दिवे वापरून केलेल्या मासेमारीला संपूर्णपणे बंदी घालून आणि पर्ससीन मासेमारीसाठी निकषही जाहिर केले आहे तसेच राज्य व केंद्र शासनाच्या मत्स्योद्योग मंत्री यांनी बेकायदेशीर एलईडी मासेमारी चालू असल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिलेले आहेत .तरीही केंद्र शासनाच्या हद्दीत म्हणजे बारा सागरी मैल व त्यापुढील हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर मासेमारी एलईडी मासेमारी चालू आहे .एलईडी मासेमारीमुळे सागरी जैवविविधतेचे अतोनात नुकसान होत असून स्थानिक मच्छीमाराला मत्स्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीशी झुंजावे लागत आहे. या विध्वंसकारी मासेमारीमुळे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्थायिक असलेल्या स्थानिक मच्छीमाराला उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे. तसेच त्याच्या उपजीविकेवर पण गंभीर परिणाम होत आहेत .केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सागरी जलदीक्षेत्रामध्ये अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा सद्यस्थितीत नाही. महाराष्ट्र राज्य सारखेच सदरच्या सागरी जलधीक्षेत्रामध्ये स्वतंत्र अंमलबजावणी कक्षाची आवश्यकता आहे.तसेच ड्रोन द्वारे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे तरी याबाबत गांभीर्याने लक्ष घालून एलईडी बेकायदेशीर मासेमारीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्रीय
मत्स्योद्योग मंत्री यांच्याबरोबर समन्वय साधून स्थानिक मच्छीमार यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी भाजपा सिंधुदुर्ग मच्छीमार सेलचे जिल्हा संयोजक रविकिरण तोरसकर यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!