*वेंगुर्ला बाजारपेठेत वाहतूक पोलिसाची नेमणूक करा*

*वेंगुर्ला बाजारपेठेत वाहतूक पोलिसाची नेमणूक करा*

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ला बाजारपेठेत वाहतूक पोलिसाची नेमणूक करा*

*वेंगुर्ला प्रतिनिधी – प्रथमेश गुरव*

वेंगुर्ला शहरामध्ये सध्या मोठ¬ा प्रमाणावर चाकरमानी व पर्यटक दाखल झालेले असल्याने मार्केटमध्ये वाहतुक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीमध्ये वाहतुक नियंत्रणासाठी सदर ठिकाणी वाहतुक पोलिस नसल्याने मोठ¬ा प्रमाणावर वाहतुक कोंडी होत असून प्रशासनाचा मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अॅड.मनिष सातार्डेकर यांनी केला आहे.
विविध वस्तु खरेदी करण्याकरीता पर्यटक व चाकरमानी मार्केटमध्ये येतात. अशावेळी वाहने योग्यरित्या पार्किग न केल्याने मार्केटमध्ये मोठ¬ा प्रमाणावर वाहतुक कोंडी निर्माण होते. ही वाहतुक कोंडी सोडवण्याकरीता या ठिकाणी वाहतुक पोलिस असणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु वाहतुक पोलिस नसल्याने ब-याचवेळा स्थानिकांना वाहतुक कोंडी सोडवावी लागते. त्यामुळे वाहतुक कोंडी होऊ नये याकरीता वेंगुर्ला शहर मार्केट येथे वाहतुक पोलिसाची त्वरीत नेमणुक करावी अशी मागणी अॅड.सातार्डेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!