*कोंकण एक्सप्रेस*
*साहित्यिकांच्या स्मारकाबाबत नगरपरिषदेकडे प्रस्ताव सादर*
*वेंगुर्ला आनंदयात्री वाङ्मय मंडळाची मागणी*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
वेंगुर्ला येथील आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ल्याच्यावतीने वेंगुर्ला नगरपरिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी हेमंत किरूळकर यांची भेट घेत त्यांचे स्वागत केले. तसेच साहित्यिकांचे स्मारक होण्याबाबतही पत्र देण्यात आले.
आनंदयात्री वाङ्मय मंडळाकडून अनेक साहित्यिक उपक्रम राबविले जात असतात. वेंगुर्ला तालुक्यात होऊन गेलेल्या महनीय लेखकांनी मराठी साहित्यात फार मोठे योगदान दिले आहे. हा सर्व तेजस्वी वारसा पुढील पिढीला ज्ञात व्हावा तसेच येथे आलेल्या पर्यटकांना वेंगुर्ल्याची ही वैशिष्ट्यपूर्ण ओळख समजावी यासाठी सर्व साहित्यिकांची माहिती तसेच त्यांची पुस्तके एकत्र असावित. येथील साहित्य व नैसर्गिक सौंदर्य यांची सांगड घालून येथील पर्यटनाला चालना देता येईल अशाप्रकारे एक साहित्यिकांचे आकर्षक स्मारक असावे यासाठी नगरपरिषदेकडून जागा उपलब्ध करून द्यावी अशाप्रकारचा प्रस्ताव ठेवणारे पत्र मुख्याधिका-यांना आनंदयात्रीतर्फे देण्यात आले. यावेळी आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्ष वृंदा कांबळी, चारूता दळवी, रविद्र परब, पि.के.कुबल व प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.