शक्तिपीठ महामार्गाविषयी पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

शक्तिपीठ महामार्गाविषयी पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

*कोंकण एक्सप्रेस*

*शक्तिपीठ महामार्गाविषयी पालकमंत्र्यांनी घेतला आढावा*

*सिंधुदुर्ग दि ८ मे (जिमाका)*

आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण प्रकल्प म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या १३ गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार आहे. या १३ गावातील लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय व त्यांचे समाधान झाल्याशिवाय या महामार्गाचे काम सुरू होणार नसल्याचे पालकमंत्री नितेश राणे म्हणाले.
जिल्हाधिकारी कार्यालयात शक्तीपीठ महामार्ग विषयी आयोजित बैठकीत पालकमंत्री बोलत होते. यावेळी खासदार नारायण राणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील प्रभारी पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी उपस्थित होते. यावेळी शक्तीपीठ विषयी सादरीकरण देखील करण्यात आले. शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यटनाला गती मिळणार असून दळणवळण सुविधा अधिक सुलभ होणार आहे. परिणामी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. पर्यटनाला चालना मिळून अर्थव्यवस्थेत वाढ होणार आहे. १३ गावामध्ये जाऊन नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल. त्यांचे समाधान झाल्याशिवाय शक्तिपीठाच्या कामाला सुरुवात केल्या जाणार नाही.असेही खासदार नारायण राणे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!