असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करणार – भगवान लोके

असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करणार – भगवान लोके

*कोंकण एक्सप्रेस*

*असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी पाठपुरावा करणार – भगवान लोके*

*असलदे ग्रामस्थांच्यावतीने पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भगवान लोके यांचा नागरी सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

असलदे गावच्या लालमातीत माझा जन्म झाला आहे . आपल्या सारख्या ज्येष्ठ मंडळींनी आत्तापर्यंतच्या माझ्या जीवनात प्रेम , आशिर्वाद दिले त्यामुळेच विविध पदापर्यंत पोहचलो आहे. कणकवली तालुका पत्रकार संघ हा जिल्ह्यातील आदर्श पत्रकार संघ आहे . या संघाची सभासद संख्या सर्वाधिक असून गेल्या काही वर्षात पत्रकार संघासाठी दिलेल्या योगदानामुळे दुस-यांदा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी सभासदांनी दिली. माझ्या गावाच्यावतीने झालेला सत्कार हा अन्य सत्कारांपेक्षा मला जीवनात मोलाचा आहे. या पदाला न्याय देतानाच माझ्या असलदे गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असणारा पाठपुरावा तो निश्चितच करेन , असा विश्वास तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष भगवान लोके यांनी व्यक्त केला.

असलदे ग्रामस्थांच्यावतीने कणकवली तालुका अध्यक्षपदी भगवान लोके यांची निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार सरपंच चंद्रकांत डामरे , व्हा. चेअरमन दयानंद हडकर यांच्या हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन परब , माजी सोसायटी चेअरमन प्रकाश परब , ज्येष्ठ पत्रकार , नरेंद्र हडकर , ग्रा.प.सदस्य आनंद तांबे , ग्रा.प.सदस्या विद्या आचरेकर , आनंदी खरात , सपना डामरे , सोसायटी संचालक शत्रुघ्न डामरे , उदय परब , प्रविण डगरे ,प्रकाश डामरे , विजय परब , गौरी लोके , हसन साटविलकर, नारायण जेठे, ग्रामसेवक संजय तांबे , विजय परब, पोलीस पाटील सावित्री पाताडे , आशा सेविका भाग्यश्री नरे , आरोग्य सेविका समिक्षा खानोलकर , विशाखा पाताडे , प्रणाली कदम , ग्रामपंचायत कर्मचारी मधुसुदन परब, प्रकाश वाळके , सत्यवान घाडी , प्रतिक्षा परब आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते .

सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले , कणकवली संघाच्या अध्यक्ष पदाचा मान हा आपल्या असलदे गावाला भगवान लोके यांच्या रुपाने दुस-यांदा मिळाला , त्याबद्दल आमच्या गावाला अभिमान आहे. आतापर्यंतच्या गावाच्या विकासाच्या वाटचालीत भगवान लोके यांचे योगदान आहे, भविष्यातही राहिलं. त्यामुळे असलदे गावाच्यावतीने हा नागरी सत्काराच्यारुपाने कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर दिलेली आहे.

पत्रकार नरेंद्र हडकर म्हणाले , पत्रकार भगवान लोके यांनी पत्रकारितेत एक आपली ओळख आणि मजबूत पकड निर्माण केलेली आहे. या पूर्वी पत्रकार संघाचे अध्यक्ष असताना त्यांनी पत्रकारांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. सामाजिक बांधिलकी जोपासत वनराई बंधारा असेल घालत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. गावात सोसायटीच्या माध्यमातून संस्थेची वाढवलेले उलाढाल , सभासद संख्या वाढवली, हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या गावाचे प्रेम आपल्या पाठीशी कायम राहिलं. पत्रकार हा विकासाला पुरक असावा.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी संजय तांबे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!