करंजे नारकरवाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिर वार्षिक उत्सव संपन्न

करंजे नारकरवाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिर वार्षिक उत्सव संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*करंजे नारकरवाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिर वार्षिक उत्सव संपन्न*

*ज्येष्ठ अभिनेत्री अक्षता कांबळी यांची प्रमुख उपस्थिती*

*ज्येष्ठ नाट्यकर्मी टेलिव्हिजन निर्माता संतोष काणेकर यांचा भव्य सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेली बावीस वर्षे सातत्याने करंजे नारकर वाडी येथील श्री ब्राम्हण देव मंदिरचा उत्सव मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहून साजरा करतात. ह्यावर्षी वाडीतील ज्येष्ठ नाट्यकर्मी करंजे गावचे सुपुत्र लेखक,दिग्दर्शक,निर्माता असलेले संतोष काणेकर यांचा अभिनेत्री अक्षता कांबळी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.तसेच ज्येष्ठ महिला आणि पुरुष यांचा ही सत्कार करण्यात आला.यावेळी सौ कांबळी यांनी आपल्या मालवणी भाषेत आपले कलाक्षेत्रातील अनुभव सांगत भरभरून शुभेच्छा दिल्या.नारकरवाडी ग्रामस्थ मंडळ चे अध्यक्ष श्री अजित काणेकर, उपाध्यक्ष प्रवीण बोभाटे ,सचिव लक्ष्मण नारकर , कार्याध्यक्ष अजित बोभाटे यांनी अक्षता कांबळी यांनी वेळ देत उपस्थित राहिल्या बद्दल मंडळाच्या वतीने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!