*कोंकण एक्सप्रेस*
*आत्रेया आचार्य महाराष्ट्र राज्यात दुसरी*
*वेंगुर्ला ः प्रथमेश गुरव*
वेंगुर्ला शाळा नं.१मधील इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी आत्रेया नंदकिशोर आचार्य हिने गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत घेतलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत १०० पैकी ९८ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तिला वर्गशिक्षक लिना नाईक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर तसेच बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रा.टेमकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कु.आत्रेया हिने प्रज्ञाशोध परीक्षसोबतच बीडीएस परीक्षेमध्ये १०० पैकी ७७ गुण तसेच सिधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केले आहे. तिच्या या विविध यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांच्यासह शिक्षक, पालक यांनी अभिनंदन केले आहे.