उत्तम फोंडेकर यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला जगातील पहिल्या हापूस आंबा पेटी म्हणून यावर्षीचे मानांकन

उत्तम फोंडेकर यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला जगातील पहिल्या हापूस आंबा पेटी म्हणून यावर्षीचे मानांकन

*कोंकण एक्सप्रेस*

*उत्तम फोंडेकर यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला जगातील पहिल्या हापूस आंबा पेटी म्हणून यावर्षीचे मानांकन*

*मालवण ः प्रतिनिधी*

उत्तम फोंडेकर यांच्या हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला जगातील पहिल्या हापूस आंबा पेटी म्हणून यावर्षीचे मानांकन मिळाल्यामुळे मालवणचे नाव जगभरात झळकले. मंत्रालयात सुद्धा मला अनेक आमदारांनी याबाबत विचारणा केली तेव्हा माझा उर अभिमानाने भरून आला. उत्तम फोंडेकर यांच्यासारखा एक तरुण बागायतदार वर्ल्ड रेकॉर्ड बरोबरच इतरही झाडांत शोध लावतो हे कृषी क्षेत्राला आणि सिंधुदुर्गाला भूषणावह आहे, असे प्रतिपादन मालवण कुडाळचे आमदार निलेश राणे यांनी केले.

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२५- २६ या मालवण – कुडाळ तालुक्यासाठी आढावा बैठक कुडाळ येथे महालक्ष्मी हॉल येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीसाठी मालवण कुंभारमाठ येथील प्रगतशील व पुरस्कारप्राप्त आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना शासन स्तरावरून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी उत्तम फोंडेकर यांचा त्यांच्या कृषी विभागातील अत्युच्य कार्याबद्दल आम. निलेश राणे यांनी पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी आम. राणे यांनी आपल्या भाषणात फोंडेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी मालवण तालुका कृषी अधिकारी, एकनाथ गुरव, श्री. कदम, श्री. गावडे यांच्यासह मोठ्या संख्येने आंबा बागायतदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!