कणकवली नगरपंचायतीला दूषित पाणी नदीपात्रात न सोडण्याचे तातडीने आदेश द्यावे*

कणकवली नगरपंचायतीला दूषित पाणी नदीपात्रात न सोडण्याचे तातडीने आदेश द्यावे*

*कोंकण एक्सप्रेस*

*कणकवली नगरपंचायतीला दूषित पाणी नदीपात्रात न सोडण्याचे तातडीने आदेश द्यावे*

*दूषित जलस्तोत्राचे शुद्धीकरण होण्याकरता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या टंचाईच्या निधीतून तरतूद व्हावी : विनायक मेस्त्री*

*सिंधुदुर्ग*

कणकवली तालुक्यातील गड नदीपात्रात कणकवली नगरपंचायत अनाधिकृतपणे सर्व शहराचे सांडपाणी कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया न करता थेट नदीपात्रात कलमडठ गावच्या जलसंच उपसा विहिरीच्या ठिकाणी सोडत आहे. परिणामी कलमठ गावामध्ये कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे व परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. कणकवली व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेला हा नैसर्गिक स्त्रोत कणकवली शहराच्या सांडपाण्याने प्रदूषित झाला आहे. यामुळे गडनदीपात्रा तील आशिये ,सातरल , कासरल, वरवडे या गावातील पाणीपुरवठा योजनांवर याचा परिणाम होणार आहे. यापूर्वी कलमठ ग्रामपंचायती द्वारे यासंदर्भात अनेक वेळा पत्र व्यवहार झालेला आहे .तसेच प्रदूषण महामंडळाने कणकवली नगरपंचायती वर दंडात्मक कारवाई केलेली आहे.
नुकतेच शिवडाव धरणातून गड नदीपात्रात पाणी सोडलेले आहे ते पाणी कलमठ गावच्या या जलस्तोत्रामध्ये येते व इथून पुढील वरील नमूद केलेल्या चार गावांना मिळते .या सोडलेल्या पाण्याचा वापर होण्याकरता कणकवली नगरपंचायतीमुळे प्रदूषित झालेल्या जलस्तोत्राचा शुद्धी करण्याकरता जिल्ह्याच्या टंचाई निधीतून तरतूद व्हावी व कणकवली नगरपंचायतीला दूषित पाणी नदीपात्रात न सोडण्याचे तातडीने आदेश द्यावे अशी मागणी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे विनायक मेस्त्री यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!