*कोंकण एक्सप्रेस*
*शामराव कानू शेळके यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी रात्री निधन*
*वैभववाडी प्रतिनिधी : संजय शेळके*
परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त अधिकारी सांगुळवाडी मगामवाडी गावचे नागरिक शामराव कानू शेळके वय वर्ष 62 यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रविवारी रात्री निधन झाले.
त्यांनी वाहक पदावर असतोना सावंतवाडी विजयदुर्ग कणकवली एसटी डेपोत काम केले तर अधिकारी म्हणून त्यांनी कणकवली तराळा व खारेपाटण एसटी स्टँडवर काम केले होते.
सांगुळवाडी गावच्या माजी सरपंच राधिका शेळके यांचे ते पती होत त्यांच्या पश्चात पत्नी दोन विवाहित मुलगे एक मुलगी सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे

