कणकवली पंचायत समिती येथे आधार केंद्र कक्षाचे सभापतींच्या हस्ते उद्घाटन

कणकवली पंचायत समिती येथे आधार केंद्र कक्षाचे सभापतींच्या हस्ते उद्घाटन

*कोकण Express*

*कणकवली पंचायत समिती येथे आधार केंद्र कक्षाचे सभापतींच्या हस्ते उद्घाटन…*

*सर्वसामान्य नागरिकांना होणार मदत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली पंचायत समिती येथे आधार केंद्राचे व आत्मनिर्भर कक्षाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती मनोज रावराणे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. या आधार कार्ड केंद्रामध्ये नवीन आधार कार्ड काढणे ,अद्यावत करणे , आधार ला मोबाईल नंबर जोडणे, आधार नंबर लिंक करणे, अशा प्रकारच्या विविध सेवा या केंद्रातून दिल्या जाणार आहेत. तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आत्मनिर्भर भारत ही योजना आखली गेली आहे. सदर केंद्रामध्ये आत्मनिर्भर भारत ही योजनाही दिली जाणार असून केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी यांच्याही योजनांची माहिती येथे उपलब्ध असणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना, प्रधानमंत्री ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान, अशा प्रकारच्या अनेक योजनांची सेवा या कक्षात दिली जाणार आहे.

या कक्षाच्या उद्घाटन प्रसंगी पंचायत सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, आधार केंद्र चालक पलक संघवी यांनी दिली या आधार केंद्र चालक जपस्थित होते व कणकवली तालुक्यातील नागरिकांनी आधार कार्ड संबंधित सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन सभापती मनोज रावराणे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!