*कोंकण एक्सप्रेस*
*मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल ९९.३६ टक्के*
*कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा सोहम लाड तालुक्यात प्रथम तर याच ज्युनिअर कॉलेजचा हर्षवर्धन पाटील द्वितीय !*
*मालवण, दि प्रतिनिधी*
फेब्रुवारी- मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यात मालवण तालुक्याचा निकाल ९९.३६ टक्के लागला आहे. परीक्षेत कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा सोहम लाड ९४.६७ टक्के गुण मिळवून तालुक्यात प्रथम आला आहे. याच प्रशालेचा हर्षवर्धन पाटील हा ९२ टक्के गुण मिळवून द्वितीय तर टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी निकिता ताम्हाणेकर ही ९१ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे.
मालवण तालुक्यात बारावी परीक्षेसाठी ७९३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यातील ७८८ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल ९९. ३६ टक्के एवढा लागला. तालुक्यात ६५ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले. तर ३०७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आणि ३८१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. ३५ विद्यार्थ्यांनी तृतीय श्रेणी प्राप्त केली.
बारावी परीक्षेत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९५.३८ टक्के लागला आहे. टोपीवाला कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल ९९.२० टक्के लागला आहे. तर भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवण, वराडकर कनिष्ठ महाविद्यालय कट्टा, न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय आर्ट्स आचरा, सौ. इं. द. वर्दम कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, पोईप, कै. सौ. जयश्री वामन प्रभू आर्ट्स आणि कॉमर्स कनिष्ठ महाविद्यालय काळसे, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा, टोपीवाला हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाचा व्होकेशनल शाखा मालवण, आर. पी. बागवे हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय मसुरे या सर्व ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे .