*कोंकण एक्सप्रेस*
*बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 97.40 टक्के…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
बारावीचा सावंतवाडी तालुक्याचा निकाल 97.40 टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या 1 हजार 621 विद्यार्थ्यांपैक्की 1 हजार 579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या वाणिज्य शाखेचा तनुज परब 94.83 टक्क्के गुणांसह तालुक्यात प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. आरपीडीची वाणिज्य शाखेची तझीन खान 94.67 टक्के गुणांसह द्वितीय तर अब्दुला शेख 92.83 टक्के (वाणिज्य) व मधुकर तेंडोलकर 92.83 टक्के (विज्ञान) गुणांसह तालुक्यात तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले.