*कोंकण एक्सप्रेस*
*सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा ओरोस येथे सत्कार*
*शिरगाव | संतोष साळसकर*
सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ कार्यकारणीच्या वतीने मालवण पत्रकार समिती अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांचा पोरस येथे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांनी पत्रकार समितीच्या पुढील कार्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्यात. परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, सचिव बाळ खडपकर, उपाध्यक्ष आनंद लोके, संतोष राऊळ, बंटी केनवडेकर, मालवण तालुका पत्रकार समिती पालक तथा जिल्हा कार्यकारणी सदस्य अमित खोत, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजन नाईक, लक्ष्मीकांत भावे, प्रशांत वाडेकर, सुहास देसाई, हेमंत कुलकर्णी विजय पालकर, रत्नदीप गवस, लहू महाडेश्वर, भगवान लोके
यांसह सर्व तालुक्यातील अध्यक्ष उपस्थित होते. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक, पत्रकार भवन सिंधुदुर्ग नगरी येथील कॉन्फरन्स हॉल येथे जिल्हा कार्यकारणी बैठकीत हा सत्कार संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव बाळ खडपकर यांनी केले.