*शिरगाव हायस्कूलला आमदार महेश सावंत यांची सदिच्छा भेट*

*शिरगाव हायस्कूलला आमदार महेश सावंत यांची सदिच्छा भेट*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिरगाव हायस्कूलला आमदार महेश सावंत यांची सदिच्छा भेट*

*माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार,ग्रामीण शिक्षणाच्या उपक्रमांची दखल*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माहिमचे आमदार महेश सावंत आणि त्यांच्या पत्नी यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेच्या शैक्षणिक कार्याची पाहणी करताना त्यांनी ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी चाललेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. या भेटीमागे सन १९९४-९५ सालच्या एस.एस.सी. बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार होता. तृप्ती साटम, हेमंत देसाई, राजू जाधव व अमित साळगावकर यांच्या प्रयत्नातून आमदार महोदयांची भेट शक्य झाली. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संभाजी साटम, शाळा समितीचे चेअरमन श्री. विजयकुमार कदम, मानद अधीक्षक श्री. संदीप साटम तसेच मुंबई कार्यकारिणीचे सदस्य व वरील माजी विद्यार्थी उपस्थित होते. श्री. विजयकुमार कदम यांनी आमदार सावंत यांना शाळेतील सध्याचे उपक्रम, विद्यार्थ्यांची प्रगती आणि भविष्यातील विकास योजनांची सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेतील सुविधांची पाहणीही करण्यात आली.

“शिक्षण हीच खरी ताकद आहे. ग्रामीण भागातील अशा प्रामाणिक उपक्रमांना शासन व खाजगी माध्यमांतून आवश्यक ती मदत मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करीन,” असे आमदार सावंत यांनी स्पष्ट केले आमदार यांच्या भेटीने शाळेच्या वाटचालीला नवसंजीवनी मिळाली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!