*कोंकण एक्सप्रेस*
*वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल 99.67%…*
*संपदा यशवंत पुजारी तालुक्यात प्रथम…*
*वैभववाडी / प्रतिनिधी*
वैभववाडी तालुक्याचा बारावीचा निकाल 99.67 इतका लागला आहे. तालुक्यातून प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण
झालेले विद्यार्थी हे के. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी या विद्यालयाचे आहेत. वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी कु. संपदा यशवंत पुजारी हिने 93. 50 टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. तर कु. श्रेया देवजी पालकर हिने 91. 17 टक्के गुण (वाणिज्य) मिळवून व्दितीय क्रमांक पटकाविला आहे. तर विज्ञान शास्त्रेची कु. मानसी मुकुंद शिनगारे हिने 86 टक्के गुण मिळवीत तृतीय आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेब्रवारी 2025 उच्च माध्यमिक परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला. वैभववाडी तालुक्यातून एकूण 329 विद्याथी बसले होते. त्यापैकी 328 विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत.
कनिष्ठ महाविद्यालय निहाय निकाल पुढीलप्रमाणे: कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी या विद्यालयातून तिन्ही शाखेतून एकूण 207 विद्यार्थी बसले होते. या विद्यालयाचा तिन्ही शाखेचा 100 टक्के निकाल लागला आहे. विद्यालयातून वाणिज्य शाखेत प्रथम क्रमांक क्रमांक – संपदा यशवंत पुजारी (93.50) टक्के, गुण द्वितीय क्रमांक कु. श्रेया देवजी पालकर (91. 17) टक्के, तर तृतीय क्रमांक – तनिष्का तावडे (84.67), टक्के, तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक- कु. मानसी मुकुंद शिनगारे (86 टक्के), द्वितीय क्रमांक- कु. प्राची औदुंबर तळेकर (84. 17), तृतीय क्रमांक- कु. साक्षी प्रविण भोसले (83.83) टक्के, कला शाखेतून प्रथम क्रमांक कु. सचित मिलिंद जाधव (71. 17) टक्के, द्वितीय क्रमांक कु. प्राची दिपक पांचाळ (70. 33) टक्के. तृतीय क्रमांक- प्रीती दयानंद गुरव (70. 17) टक्के.
छत्रपती शिवाजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय नेलें तिरवडे या विद्यालयातून कला शाखेतून एकूण 19 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 1 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 96 टक्के लागला आहे. विद्यालयातून प्रथम क्रमांक- कु. सिद्धेश यशवंत सुतार (71.83) टक्के, द्वितीय क्रमांक- कु. ऋषभ भिवाजी घाटकर (66.67) टक्के, तर तृतीय क्रमांक- कु. सायली संजय गुरव (64.83) टक्के.
आचिर्णे आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज आचिर्णे या विद्यालयातून एकूण 67 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु. पार्थ विलास पाताडे (79.83) टक्के. द्वितीय क्रमांक कु. नुरनिशा गौस बोबडे (77.50) टक्के, तृतीय क्रमांक- कु. सिद्धी गोविंद गावडे (75. 17) टक्क्के, तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक-समीक्षा अनंत चंदुरकर (80.67) टक्के, द्वितीय क्रमांक- तनिष्क अमित खानविलकर (77. 17) टक्के, तृतीय क्रमांक- सिद्धी वासुदेव झोरे (74.83) टक्के.