*कोंकण एक्सप्रेस*
*सशक्त भारताचा एकच नारा… व्यसनांना देऊ नका थारा*
*साळशी येथे नशा मुक्ती अभियान अंतर्गत जनजागृतीपर प्रभात फेरी*
*शिरगांव | संतोष साळसकर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ मे ते ३१ मे या कालावधीत अंमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी एक महिन्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने देवगड तालुक्यातील साळशी येथे नशा मुक्ती जनजागृती अभियानांतर्गत प्रभात फेरी काढण्यात आली.
या प्रभात फेरीत विविध जनजागृतीपर घोषणा देण्यात आल्या. ‘ जो करील धूम्रपान… त्याचे जीवन होईल घाण’…’तंबाखूचा घास… जीवनाचा नाश’, ‘सशक्त भारताचा एकच नारा…व्यसनांना देऊ नका थारा’, ‘ व्यसन करणे सोडा… आरोग्याची नाते जोडा’. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी सरपंच सौ वैशाली सुतार, पोलीस पाटील सौ. कामिनी नाईक, साळशी देवस्थान कमिटीचे चेअरमन योगेश मिराशी, माजी उपसरपंच राजेंद्र साटम, महेश गावकर, किरण नाईक, सौ. सोनल नाईक, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विनायक गावकर, विजय गावकर, विलास गावकर, बंडू नारिंग्रेकर, विजय मिराशी, वैभव घाडी, सीआर पी सौ. ऋतुजा घाडी , सौ सुपर्णा पारधी, साईनाथ साळसकर, अविनाश सातोसे , कुलदीपक साळस्कर, प्रतीक घाडी , ओंकार पारधी, अक्षय गावकर, दिनेश साळसकर आदींसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.