*कोंकण एक्सप्रेस*
*कलाक्षेत्रातील अफाट कर्तृत्वाबद्दल श्री प्रसाद राणे सरांचा मराठा मंडळाकडून गौरव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेचे कला शिक्षक श्री प्रसाद राणे सरांना मराठा मंडळ कणकवली संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार देवून माननिय खासदार नारायणजी राणे साहेब यांच्या हस्ते गौरव करण्यात आला . विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत श्री प्रसाद राणे सरांनी स्वकर्तृत्वातून कलेचे बाळकडू सर्वविद्यार्थांना देत असतांनाच पर्यावरण वृक्षसंवर्धन प्लॅस्टिक मुक्ती स्वच्छता अभियान चित्रकलेचा प्रसार वृद्धाश्रमांना मदत अशा समाज सेवेच्या विविध क्षेत्रांत सरांनी मनापासून कार्य केलेले आहे कधिच कुठे अहंभाव व गर्व बाळगला नाही शिक्षण सर्वांपर्यंत पोहचावे यासाठी अनेक उपक्रम राबवून प्रशालेच्या लौकीकात भर घातली आहे प्रसाद राणेसरांच्या विनयशिल वृत्तीमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर सर्वांचे लोकप्रिय झाले . त्यांच्या या यशस्वी वाटचालीसाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी ‘ प्रशालेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी व पालकांनी अभिनंदन केले .