*कोंकण एक्सप्रेस*
*पंचायत समिती देवगड येथे स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
पंचायत समिती देवगड येथे १२ वी नंतर पुढे काय? करियर कट्टा स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत कृषी विस्तार अधिकारी लक्ष्मीकांत जोशी यांनी मार्गदर्शन केले.
शासनाच्या १०० दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत पंचायत समिती देवगड आयोजीत स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करताना कृषी अधिकारी लक्ष्मीकांत जोशी यांनी शिक्षणाच्या संधी – कला वाणिज्य विज्ञान क्षेत्रातील वेगवेगळ्या संधी याबद्दल माहिती तसेच स्पर्धा परीक्षा च्या माध्यमातून मधून UPSC, MPSC railway board, सरळसेवा इत्यादी परीक्षा मधून प्रशासनात विविध पदावर काम करण्यासाठी कोण कोणत्या परीक्षा असतात, त्यासाठी पात्रता काय असते, कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात याची माहिती दिली तसेच गट विकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी स्पर्धा युगातील तंत्रज्ञानातील नवीन संधी AI बाबत माहिती दिली.
यावेळी कृषी विस्तार अधिकारी अभिजित मदने, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक मेघा राणे, विस्तार अधिकारी अंकुश जंगले, शिक्षक सचिन जाधव, वरीष्ठ सहाय्यक विलास लोके आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.