तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी साहित्य साधने वितरण कार्यक्रम

तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी साहित्य साधने वितरण कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी साहित्य साधने वितरण कार्यक्रम*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

तालुकास्तरीय दिव्यांग विद्यार्थी साहित्य साधने वितरण कार्यक्रम गटसाधन केंद्र पंचायत समिती वैभववाडी येथे मा. गटविकासअधिकारी श्री. रामचंद्र जंगले गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे यांच्या हस्ते पार पडला.
या वितरणाच्या कार्यक्रमाकरिता तालुक्यातील अंगणवाडी ते इयत्ता 12 वी मध्ये शिकत असणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याकरिता समग्र शिक्षा समावेशित शिक्षण अंतर्गत शैक्षणिक सहाय्यभूत सेवा सुविधा करिता अनुकूल साहित्य साधने वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी वैभववाडी तालुक्यातील विविध दिव्यांग प्रवर्गातील 17 लाभार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना या साहित्यांचा लाभ देण्यात आला. साहित्या मध्ये अतितीव्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता एअर बेड, कॉर्नर सिटिंग, थेरपी बॉल ,सेंसरी किट, वाॅकर, एम आर किट तसेच अल्पदुष्टीधारक विद्यार्थ्यांकरिता लो-व्हीजन किट आणि बौद्धिक अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्याकरिता अध्ययन सुलभ होण्याच्या दृष्टीने एम आर किट व शैक्षणिक साहित्य, विविध पझल किट इत्यादी वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी पालकांना विविध साहित्य हाताळणी व वापर बाबत समावेशित विभाग कर्मचाऱ्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.
या कारणे कार्यक्रमास दिव्यांग विद्यार्थी पालक समावेशित शिक्षण विभागातील विशेष शिक्षक श्री. दत्तात्रय तापेकर विशेषतज्ञ श्री. महेश प्रभाकर व श्रीम. वैदही पिळणकर तसेच विषय साधन व्यक्ती श्रीम. स्नेहल रावराणे, श्री. तानाजी कांबळे व श्री. स्वरा जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!