माळगाव येथील सभागृहाचे मा. खा. विनायक राऊत, मा. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन*

माळगाव येथील सभागृहाचे मा. खा. विनायक राऊत, मा. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन*

*कोंकण एक्सप्रेस*

*माळगाव येथील सभागृहाचे मा. खा. विनायक राऊत, मा. आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन*

*सभागृह बांधकामासाठी खासदार संजय राऊत यांनी दिला १७ लाख रु.निधी*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून मालवण तालुक्यातील माळगाव येथील ऍड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कुल या प्रशालेसाठी प्रशस्त सभागृह उभारण्यात आला आहे. त्यासाठी खा. संजय राऊत यांनी १७ लाख रुपये निधी मंजुर केला होता. या सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून आज माजी खासदार विनायक राऊत,माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते या सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर,पोईप विभागप्रमुख विजय पालव, उपविभाग प्रमुख भाऊ चव्हाण, युवासेना उप तालुकाप्रमुख अमित भोगले, माळगाव उपसरपंच शशिकांत सरनाईक, प्रशाला संस्था अध्यक्ष डॉ. संजय खोत, उपाध्यक्ष अरुण भोगले, सचिव हेमंत हडकर, मुख्याध्यापक तुकाराम गिरी, माजी मुख्याध्यापक उदय जोशी, असरोंडी शाळेचे संस्थाध्यक्ष व्ही. के. सावंत, सुधीर पडेलकर, राजन ताम्हणकर, गुरुनाथ ताम्हणकर, आणा सुर्वे, माळगाव ग्रा. प. सदस्य राजश्री शेलार, उत्तम परब, प्रवीण धामापूरकर, अक्षय भोसले, सतीश नाईक,चिंतामणी मयेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!