*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत विजयी*
*शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा पराभव*
*भाजपला ३० तर शिवसेनेला १९ मते मिळालीत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा वरचष्मा कायम राहिला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी संजना सावंत यांना ३० तर शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना १९ मते अध्यक्षपदासाठी पडली. त्यामुळे शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांचा ११ मतांनी पराभव झाला.जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांना दोन अध्यक्ष पदाचा बहुमान मिळाला आहे.