*कोंकण एक्सप्रेस*
*पालकमंत्री नितेश राणे यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा*
*सिंधुदुर्गनगरी दिनांक 30 (जिमाका) :-*
मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे गुरुवार दि. 1 मे 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि. 1 मे 2025 रोजी सकाळी 7.30 वाजता ओम गणेश निवासस्थान, कणकवली, येथून मोटारीने ओरोसकडे प्रयाण, सकाळी 8 वाजता महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहणास उपस्थिती (स्थळ:- पोलीस परेड ग्राउंड, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी), सकाळी 9 वाजता मा. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या उद्घाटनास उपस्थिती (स्थळ:- सिंधुदुर्गनगरी, ता.कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग), सकाळी 11 वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम बुध्दिमत्ता A. I. तंत्रज्ञानाचा वापर सुरु करण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय येथे उद्घाटनास उपस्थिती, (स्थळ:- शरद कृषि भवन, ओरोस, सिंधुदुर्ग), दुपारी 2 वाजता श्री. शशिकांत राणे, मु.पो.हळवल,ता. कणकवली यांच्या कन्येच्या विवाहास उपस्थिती . (स्थळ:- स्वामी समर्थ सांस्कृतिक सभागृह, बांदा, दोडामार्ग, सिंधुदुर्ग),
0000