*आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उद्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण*

*आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उद्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण*

*कोंकण एक्सप्रेस*

*आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून उद्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण*

*सावंतवाडी । प्रतिनिधी*

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील रुग्णांच्या सेवेसाठी उद्या १ मे रोजी सकाळी १० वाजता सावंतवाडी नगरपरिषदेजवळील बॅ. नाथ पै सभागृहात नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण होणार आहे. माजी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री आणि विद्यमान आमदार दीपकभाई केसरकर यांच्या शुभहस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या रुग्णवाहिकेमुळे सावंतवाडीतील आरोग्यसेवेत मोठी भर पडणार असून, रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

या कार्यक्रमाविषयी बोलताना आमदार दीपकभाई केसरकर म्हणाले की, “रुग्णांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. ही रुग्णवाहिका मतदारसंघातील रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना वेळेवर रुग्णालयात पोहोचवणे शक्य होईल आणि त्यांना योग्य उपचार मिळू शकतील.” तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सावंतवाडी तालुका शिवसेना व दीपक भाई मित्रमंडळातर्फे करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!