*कोंकण एक्सप्रेस*
*शिरोडा ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार , सदस्याच्या हट्टापायी सामान्य नागरिक वेठीस……*
*वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायत हद्दीतील धानजीवाडा येथील प्रकार……*
*श्रीकृष्ण धानजी यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या घरालगत श्रीम. अनिता अनिल धानजी यांनी आपली मुलगी व ग्रामपंचायत सदस्य कु.नंदिनी धानजी यांच्या पदाचा गैरफायदा घेऊन अनधिकृत बांधकाम दादागिरी व जबरदस्तीने केले…*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
जुन २०२४ पासून पाया खोदकाम सुरू करताच तक्रारदार ह्यांनी आपल्या घरापासून नियमानकुल ३ मी. सामासिक अंतर सोडून घर बांधा असे सांगून ग्रामपंचायत ला तक्रार केली… त्यावर १ महिन्यानंतर पायाचे काम सुरू असताना ग्रामपंचायत पाहणीसाठी आली व सगळं बरोबर आहे नंतर सामासिक अंतर सुटेल असे सांगून तुम्ही मोजणी करून विषय मिटवा असे सांगून या वर पडदा टाकला….
*तक्रारदार ह्यांचा मुद्दा आणि तक्रार हीच होती की ३०४ चौ.फुट चा घरपत्रक उतारा असताना तिप्पट बांधकाम करण्याची परवानगी दिली कोणी??. तसेच दोन घरांमध्ये नियमानुसार जे अंतर सुटले पाहिजे ते अंतर पण सुटत नाहीये…*
तसेच ग्रामपंचायत ला नवीन किंवा वाढीव बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नाही… फक्त जुन्या घरांच्या दुरुस्तीसाठी ना हरकत दाखला देण्याचे अधिकार असताना *तिप्पट वाढिव बांधकाम ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून देवुन ही त्यावर कारवाई न करता ते सर्व बांधकाम परवानगी ने बरोबरच आहे असे सांगून आमची दिशाभूल केली आहे…*
वर्षभर आम्हाला आर्थिक , मानसिक त्रास ग्रामपंचायत ने दिला आहे…..यावर वरिष्ठांकडे तक्रार दाखल करूनही ग्रामपंचायत बिनधास्त आहे….
*वरिष्ठांकडे तक्रार दाखल केल्यानंतर कलेक्टर, सीईओ, तहसीलदार यांच्याकडून कार्यवाही करण्यासाठीची पत्रे ग्रामपंचायतला देण्यात आली.. तरी ती पत्रे आमच्या माहितीसाठी आहेत त्यावर कार्यवाही करायची गरज नाही असे ग्रामसेवकांकडून वारंवार सांगण्यात आले…*
तक्रार अर्जावरून गटविकास अधिकारी यांनी आपल्या कडे सुनावणी लावुन त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले ते असे आहेत की :-
*1) घरमालकाने जुनी इमारत पूर्णपणे पाडून नवीन इमारत बांधकाम केलेले आहे. सदर इमारतीचे मूळ बांधकाम हे ३०४.१४ चौ.फूट असून त्यांनी वाढीव बांधकाम केल्याचे निदर्शनास येत आहे. तरी सदर इमारतीला आवश्यक ती ग्रामपंचायतीची परवानगी घेणे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५२ नुसार आवश्यक आहे.*
*२) सदर इमारत बांधकामाबाबत कलम ५२ नुसार परवानगी न घेतल्यास ग्रामपंचायतीने कलम ५२ चे पोटकलम ४ व ५ नुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने कारवाई करावी.*
*३) सदर इमारत बांधकामधारक श्रीम. अनिता अनिल धानजी यांची मुलगी कु. नंदिनी अनिल धानजी ही ग्रामपंचायत सदस्य असून सदर सदस्य पदाचा गैरफायदा घेतला असल्यास त्याप्रमाणे सदस्य अपात्रतेचा प्रस्ताव सादर करणेत यावा.*
या पत्राला १ महिना उलटूनही ग्रामपंचायत कडुन अद्याप ही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही… याउलट ग्रामसेवक हे असे सांगत आहेत की माणुसकीच्या दृष्टीने ग्रामपंचायत त्यांच्यावर कारवाई करू शकत नाही… मग वर्षभर आम्ही ग्रामपंचायत कडे जाऊन आमच्या घराच्या होणाऱ्या नुकसानीबद्दल गयावया केली असताना ग्रामसेवकांना आमची दया का आली नाही…
*म्हणूनच या सर्व प्रकाराला कंटाळून महाराष्ट्र दिनी १ मे २०२५ ला मी माझ्या कुटुंबा समवेत मुख्य कार्यकारी अधिकारी, ओरस थेथे उपोषणाला बसणार आहे….. पुढे होणाऱ्या परिणामांना व आमच्या बर्या वाईटाला ग्रामपंचायत, विषेशत: सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक, तसेच नियमभंग करणारी सदस्य जबाबदार आहेत…*