एसटी महामंडळाचे भोगस कारभाराचा फटका नावळे गावातील प्रवाशांना*

एसटी महामंडळाचे भोगस कारभाराचा फटका नावळे गावातील प्रवाशांना*

*कोंकण एक्सप्रेस*

*एसटी महामंडळाचे भोगस कारभाराचा फटका नावळे गावातील प्रवाशांना*

*वैभववाडी ः संजय शेळके*

एसटी महामंडळाचे भोगस कारभाराचा फटका नावळे गावातील प्रवाशांना बसला असून वैभववाडीचा बुधवार आठवड्या बाजार दिवशी नावळे गावात जाणारे दोन एसटी बस नादुरुस्त होऊन बंद पडले मुळे नावळे गावातील प्रवाशांना चार तास एस स्टैंड वर ताटकळत बसावे लागले त्यामुळे प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
वैभववाडी तालुक्याचा आज बुधवार आठवड्याचा बाजार असून नावळे गावात दिवसभर पाच एसटी बस जातात आज बुधवार आठवडा बाजाराच्या दिवशी दोन एसटी बस नादुरुस्त होऊन बंद पडल्याने त्या गावात गेल्या नसलेमुळे नावळे गावातील प्रवाशांना चार तास वैभववाडी एसटी स्टँडवर ताटकळत बसावे लागले यामुळे एसटी महामंडळाच्या कार्यावर नावळे गावातील प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली तसेच सायंकाळी पाच वाजता कंट्रोलर आपली ड्युटी संपवून घरी गेल्यानंतर एसटी स्टँडला कोणीही जबाबदार व्यक्ती व अधिकारी नसल्याने प्रवाशांनी दात मागाची तरी कोणाकडे असा प्रश्न निर्माण झाला अखेर चालक व वाहक यांनी कणकवली कार्यालयाशी संपर्क साधून जादाची आलेली बस ताब्यात घेऊन सायंकाळी उशिरा चालक यांनी ही बस नावळे गावातील प्रवाशांना घेऊन मार्गस्थ केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!