शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकरांचे देवगडच्या प्रश्नांसाठी १ मे रोजी आमरण उपोषण*

शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकरांचे देवगडच्या प्रश्नांसाठी १ मे रोजी आमरण उपोषण*

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळसकरांचे देवगडच्या प्रश्नांसाठी १ मे रोजी आमरण उपोषण*

*देवगड ः प्रशांत वाडेकर*

शिवसेनेचे तालुका प्रमुख विलास साळसकर हे देवगड-जामसंडे नगरपंचायतसह तालुक्यातील चार महत्वाच्या प्रश्नांसाठी १ मे रोजी महाराष्ट्र दिनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
नगरपंचायत हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेचे रखडलेले काम, देवगड-जामसंडे शहरासाठी पिण्याचे पाणीपुरवठा करणाऱ्या नियोजित कोर्ले सातंडी धरण नळपाणी योजनेच्या तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी न. पं. ला येणारे अपयश, देवगड तालुक्यातील जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत झालेली अर्धवट व निकृष्ट कामे, विजयदुर्ग प्रादेशिक नळपाणी योजनेचे अर्धवट काम याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आपण १ मे रोजी स. ८ वा. पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडणार असल्याची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख साळसकर यांनी दिली.
साळसकर म्हणाले, आपण हे आंदोलन जनतेच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच प्रशासनकडून याबाबत योग्य कार्यवाही व्हावी यासाठी करीत आहे. यासाठी जनतेचा आपल्याला पाठींबा आहे. या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत असताना संबंधित गावातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!