नरडवे येथील डॉ गणेश केळकर यांचे निधन

नरडवे येथील डॉ गणेश केळकर यांचे निधन

*कोंकण एक्सप्रेस*

*नरडवे येथील डॉ गणेश केळकर यांचे निधन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

गेली 63 वर्ष नरडवे पंचक्रोशीत अविरत रुग्णसेवा देणारे डॉक्टर डॉ गणेश दत्तात्रय केळकर यांचे मंगळवारी नरडवे येथे निवास स्थानी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
मूळचे वेंगुर्ला खानोली येथील डॉक्टर केळकर यांनी 1962 सालापासून नरडवे येथे रुग्णसेवा सुरू केली. डोंगर प्रदेश, प्रचंड पाऊस, दळणवळण यंत्रणा एकदम प्राथमिक अवस्थेत असतानाही डॉ केळकर यांनी नरडवे गावातील अतिदुर्गम भागासोबत लगतच्या कुडाळ तालुक्यातील जांभवडे, कुपवडे दुर्गावाडी तसेच घाटमाथ्यावरील पाटगाव भागातही रुग्णांना अविरत सेवा दिली. गोड वाणी आणि आत्मविश्वासाने मिळणारे उपचार या मुळे अनेक कुटुंबीयांचे ते ‘ घरचे डॉक्टर’ होते. त्यांच्या या सेवेबाबत सिंधुदुर्ग डॉक्टर्स च्या DFC तर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते.
मंगळवारी नरडवे येथे त्यांच्यावर अंत्य संस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय लोटला होता.
वेंगुर्ला मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ सुनील, कणकवली येथील डॉ संतोष, तसेच नरडवे येथील डॉ सुहास यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात सूना नातवंडे असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!